रस्त्याची झाली चाळण; वाहनाबरोबरच नागरिकांची हाडे झाली खिळखिळी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- शिर्डी व शिंगणापूर या दोन महत्वाच्या देवस्थानांना जोडण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव- बेलापूर या रस्त्याचे काम करण्यात आले होते.

मात्र या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली असून वाहनचालकांना वाहन चालविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शिर्डी व शिंगणापूर या दोन महत्वाच्या देवस्थानांना जोडण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव- बेलापूर या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मुळातच या रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहे.

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाकडून थातूरमातूर डागडुजी करून खड्डे बुजविले जातात. दोन तीन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती होत असल्याने हा रस्ता धोकादायक बनत आहे.

रस्त्याच्या दोन्ही बाजु चेपल्याने मधोमध उंचवटा तयार झाल्याने वाहन चालकांची वाहन चालविताना त्रेराधीरपट उडत आहे. तालुक्यातील भेर्डापूर, कान्हेगाव, कारेगाव, पाथरे आदी गावातील प्रवाशांना या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो.

रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते अशी अवस्था झाली आहे.अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच या परिसरातील दुचाकीस्वारांना पाठीच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

साईडपट्टा खचल्याने वाहन चालकांना वाहन नेमके कोठून चालवावे? असा प्रश्न पडत आहे. संबंधीत विभागाने या रस्त्याचे पक्के डांबरीकरण करावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24