अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2021 :-पाथर्डी तालुक्यातील चितळी गावात ग्रामपंचायत निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवार व त्यांच्या पॅनलप्रमुखांनी गावातील तिन रस्ते बंद केले आहेत.
खाजगी जमिनीतून केलेल्या रस्त्यावरुन लोकांची वाट बंद केली आहे. तर सर्वेनंबरचा रस्ता करुन देण्यात ही मंडळी विरोध करीत आहेत. त्यामुळे निवडुन आलेल्या पॅनलप्रमुखालच स्वतच्या घरी जाता येत नाही.
त्यांचा उस तुटुन जाण्यासही अडचण निर्माण झाली आहे. चितळी गावात अशोक ताठे यांनी प्रस्थापित पुढाऱ्यांना विरोध करीत स्वत: पॅनल तयार केला.
भारतीय जनता पक्षाचे काही कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांनी एकत्रीत येवुन पॅनल तयार केला मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.
पराभुत झाल्यानंतर जेसीबी मशीन लावुन सुरु असलेले शेताकडे व वस्त्यांकडे जाणारे काही गावपुढाऱ्यांनी रस्ते बंद केले. आमची खाजगी जागा असल्याने रस्ता द्यायचा की नाही असा आमचा प्रश्न आहे.
तुम्ही मते दिले नाहीत ज्यांना मते दिले त्यांच्याकडुन रस्ता घ्या अशी येथील काही मंडळी बोलत आहेत. विजयी झालेले अशोक आमटे हे पॅनलप्रमुख आहेत. ते उद्योजक आहेत गावाची सेवा करायची म्हणून गावात आले.
गोरगरीबांना मदत करणे, अडचणीच्या काळात धाऊन जाणे, स्वखर्चाने काही रस्ते केले. गावाच्या विकासाचा मुद्दा घेवुन ते जनतेत गेले जनतेने त्यांना व सहकाऱ्यांना निवडुण दिले.
निवडणुक जिंकले मात्र त्यांच्या शेतात व वस्तीवर जाण्याचा रस्ताच बंद केला गेला. त्यांनी तहसीलदार शाम वाडकर यांची भेट घेतली व सर्वे नंबरचे रस्ते खुले करुन देण्याची मागणी केली.
मंडलअधिकाऱ्यांनी गावात येवुन पाहणी केली. खाजगी जमिनीतून रस्ता असल्याने तो बंद केला असल्याचे स्थानिकांनी त्यांना सांगितले.