अहमदनगर Live24 टीम, 2 नोव्हेंबर 2020 :- रस्त्यांची दुरवस्था हा अहमदनगर जिल्ह्याला लागलेला शाप आहे. जिल्ह्यातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. राहुरी तालुक्याच्या पूर्वभागामध्ये देखील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.
त्या झालेल्या अतिवृष्टीने आणखीनच भर टाकली आहे. परंतु त्यामुळे हे खराब रस्ते ऊस तोडणीला अडथळा ठरत असून आता शेतकर्यांनी लोकवर्गणीतून रस्ता दुरूस्तीचे काम सुरू केले आहे.
वळणमध्ये अगस्ती कारखाना, प्रसाद शुगर, दौंड शुगर इत्यादी कारखान्यांची तोडणी सुरू झाली आहे. पण रस्ते नसल्यामुळे रस्त्यावर जेसीबीच्या सहाय्याने रस्त्याच्या कडेची माती घेऊन रस्त्यावरच टाकण्याची वेळ आली आहे.
यामध्ये वळण ते खिलारी वस्ती ते पाटापर्यंत सकाळी शेतकर्यांनी लोकवर्गणी करून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. रस्ता सुरळीत करून शेतकर्याला आपला ऊस लवकरात लवकर कसा जाईल? याची चिंता पडली आहे.
याकरिता आपापल्यापरीने आपापल्या नेत्याकडे प्रयत्न करीत आहेत. दयनीय झालेल्या रस्त्यावरून आपला ऊस काढण्यासाठी शेतकरी अडचणीतून मार्ग काढत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved