अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-वांबोरी ते शेंडी मार्गे हा रस्ता नगरला जोडलेला आहे. प्रमुख जिल्हा मार्ग असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वांबोरी – नगर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले. परंतु खड्डे बुजवण्यासाठी निकृष्ट दर्जाची सँडक्रश, तसेच अत्यल्प डांबराचा वापर केला जात आहे. या कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून यासाठी यापूर्वी ग्रामस्थांना आंदोलनही करावे लागले होते.
रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. परंतु, खड्डे बुजवण्यासाठी वापरले जाणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे आहे. खड्डे झाडून घेऊन त्यात तीन ते चार इंची दगड टाकले जातात. त्यावर अत्यल्प डांबर टाकून सँडक्रश टाकून रोलर फिरवले जात आहे.
ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत असताना, स्थानिक नेतेमंडळींकडून डोळेझाक झाल्याचे चित्र आहे. वांबोरी हे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मतदारसंघातील गाव असून या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याचे काम दर्जेदार न झाल्यास नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved