लघुशंकेसाठी थांबलेल्या ट्रकचालकास लुटले ; या महामार्गावरील घटना

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- अलीकडे संपूर्ण जिल्ह्यात खून,दरोडे,चोरी,लुटमार या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नुकतीच नगर औरंगाबाद रोडवरील वांबोरी फाट्यावर लघु शंका करण्यासाठी थांबलेल्या

एका ट्रक चालकास पल्सरवरून आलेल्या तिघांनी  कोयता व चाकूचा धाक दाखून जबर मारहाण करून दोन मोबाईल व रोख रक्कम असा ४६ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.

ही घटना गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर असे की, ट्रक चालक न्यानेश्वर किसन गजरे वय २७ रा.निघोज ता.पारनेर हे त्यांच्या ताब्यातील ट्रक (क्र.एमएच १६ सीसी ०८६१) घेऊन  नगर औरंगाबाद रोडने जात असताना ते या रोडवरील वांबोरी फाट्यावर लघु शंका करण्यासाठी थांबले.

यावेळी पाठीमागून आलेल्या काळ्या रंगाच्या पल्सरवरून आलेल्या तिघांनी  ट्रकच्या कॅबिनमध्ये घुसून कोयता व चाकूचा धाक दाखवून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत दोन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

याबाबत ट्रक चालक न्यानेश्वर किसन गजरे याने दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिसानी अज्ञात तीन चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोसई कणसे हे करत आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24