ट्रकचालकाला लुटले; चौघांविरोधात गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक मिळाले तरी देखील जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख काही केल्या कमी होताना दिसत नाहीये.

दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांमुळे आधीच नागरिक भयभीत झाले आहे, यातच रस्तालुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतेच श्रीगोंदा तालुक्यात रस्तालुटीचा प्रकार घडला आहे.

अकलूजमधून साखर पोते घेऊन दौंड-नगर महामार्गावरून नगरकडे जाताना श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे परिक्रमा कॉलेजच्याजवळ अकराच्या सुमाराला ट्रकला चार जणांनी अडवून चालक समरत बेरूलाल धनगर, मध्यप्रदेश याच्याकडील ७३ हजार रुपये लुटण्याचा प्रकार घडला. याबाबत श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, मध्यप्रदेशातील समरत धनगर हा ट्रकचालक १८ टायरच्या गाडीत साखर पोते घेऊन जात होता. पाठीमागून दोन दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी ट्रक बाजूला घेण्यास सांगितले. त्यातील दोघांनी ट्रकच्या कॅबिनमध्ये येऊन गाडीची तपासणी करायची आहे, असे सांगितले.

तपासणी करताना कॅबिनमधील टूलबॉक्समध्ये ठेवलेले ७३ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर दोन्ही मोटारसायकलने ते दौंडच्या दिशेने निघून गेले. चालकाने ट्रकमालकास फोनद्वारे माहिती दिली.

याप्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात घटनेची फिर्याद चालकाने दिली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक रामराव डिकले करीत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24