Ahmednagar News : दरोडेखोरांचा धुमाकूळ ! ‘या’ गावातील विजेचे रोहित्र बंद करून ६ घरांवर दरोडे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांत चोरी, दरोडे आदी घटनांमुळे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. आता संगमनेर तालुक्यातून एक खळबळजनक बातमी आली आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील वनकुटे गावात दरोडेखोरांनी चांगलाच धुमाकूळ घातला.

गावची विजेचा डीपी बंद करून दरोडेखोरांनी तब्बल ६ घरे फोडत लाखोंचा ऐवज लांबवला. शनिवारी (१३ जानेवारी) मध्यरात्री ही घटना घडली. या घटनेमुळे गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. सकाळी गावकऱ्यांच्या लक्षात येताच, त्यांनी घारगाव पोलिसांना कळवले.

पोलिसांनी घटनास्थळाची धाव घेत पाहणी केली. यावेळी श्वान व ठसे तज्ज्ञांना प्रचारात करण्यात आले होते. दरम्यान या घरातील मंडळी मुंबई येथे गेली असल्याने किती ऐवज चोरीला गेला, हे समजू शकले नव्हते.

अधिक माहिती अशी : दरोडेखोरांनी आधी गावची डीपी बंद केली. लाईट बंद होताच अंधारात आसपासच्या घरांच्या कड्या लावून ६ घरांना लक्ष्य केले. तुळसाबाई चंद्रकांत शेळके, धोंडिभाऊ शंकर हांडे, पोपट नाथा पवार, साहेबराव अनाजी हांडे, लक्षण रामभाऊ शेळके आदींची ही घरे आहेत.

लिलाबाई रंधे या महिलेचे २ दिवसांपूर्वी घर फोडून चोरी झाली होती. या घटनेचा तपास लागत नाही, तोच लागोपाठ दुसरी घटना घडली. दरम्यान आता घारगाव पोलिसांनी या घटनेचा तपास लावावा, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा ग्रामस्थ अशोक हांडे यांनी दिला आहे. सध्या नागरिकांत घबराटीचे वातावरण आहे.