अहमदनगर Live24 टीम ,6 जुलै 2020 : दोन दिवसांपूर्वी हॉटेल चालकाकडून तीन लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी दिगंबर लक्ष्मण गेंट्याल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान खंडणीचा गुन्हा दाखल केल्याच्या रागातून नगर शहरातील हॉटेल रेडिंयन्सवर दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
हा गुन्हा दाखल केल्याचा राग आल्याने राऊत याच्यासह पाच ते सहा जणांनी हॉटेलमध्ये येवून बळजबरीने दहशत निर्माण करुन हॉटेलच्या काऊंटरमधून साडेबारा हजार रूपयांची रक्कम चोरून नेली.
याप्रकरणी आरोपी बंटी उर्फ भावेश अशोक राऊत, रा. माणिक चौक नगर व इतर अनोळखी पाच ते सहा जणांच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews