अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- शिर्डी शहर पोलीस वाहतूक शाखेकडून साईभक्तांची लूट सुरु असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. यामुळे दर्शनासाठी येणारे भाविक वैतागले आहे.
यातच वाहतूक शाखेच्या या कारभाराला वैतागून ग्रामस्थांनी आज सोमवार दि. 31 रोजी सकाळी 11 वाजता शिर्डी शहरातील मारुती मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले आहे.
नेमके काय आहे व्हायरल मेसेजमध्ये? शिर्डीत साईभक्तांची एन्ट्री होताच नियमाच्या नावाखाली शिर्डी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून साईभक्तांना प्रचंड त्रास दिला जात असल्याचे बोलले जाते. साईभक्तांना होणार्या प्रचंड त्रासाबद्दल ग्रामस्थांना खरंच वाईट वाटत असेल तर त्यांनी या बैठकीस उपस्थित राहावे.
फक्त घरी बसून सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा शिर्डी ग्रामस्थ म्हणून आपली साईभक्तांबद्दल असलेली आत्मीयता दाखवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने या प्रश्नाला वाचा फोडून साईभक्तांना न्याय मिळवून देणे आपली जबाबदारी आहे.
आज सकाळी 11 वाजता मारुती मंदिर येथे साईबाबा मंदिराचे गेट क्रमांक तीन खुले करण्यासाठी व शिर्डी शहर पोलीस वाहतूक शाखेकडून साईभक्तांचे
नियमाच्या नावाखाली सुरू असणारी लूट थांबविण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले असून ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.