अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाने निम्म्यापेक्षा जास्त जागा ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकले आहेत, असे असताना आमच्याच ग्रामपंचायती राष्ट्रवादीने जिंकल्या, असे दाखवत रोहित पवार यांनी 80 टक्के जागा राष्ट्रवादीने जिंकल्याची सांगत हवेत गोळीबार केला आहे, अशी टीका पत्रकार परिषदेमध्ये केली.
56 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकालाच्या पार्श्वभूमीवर विश्रामगृहामध्ये माजी मंत्री राम शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रथम नगराध्यक्ष नामदेव राऊत,
तालुका अध्यक्ष डॉ. सुनील गावडे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन पोटरे, पप्पू धोदाड, विनोद दळवी, ज्ञानदेव लष्कर, अमृत काळदाते, अनिल गदादे, सुनील यादव, वैभव शहा व शेखर खरमरे आदी उपस्थित होते.
माजी मंत्री राम शिंदे म्हणाले, 508 ग्रामपंचायतीच्या जागांपैकी 238 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकले आहेत. जवळपास 50 टक्केपेक्षा जास्त यश भाजपाला एकट्याला मिळाला आहे.
यामुळे ‘खोट बोल पण रेटून बोल‘ ही रोहित पवार यांची शेती आहे. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवण्याचा त्यांचा हातखंडा मोठा आहे.अशा विविध मुद्यांच्या आधारे आ. रोहित पवार यांच्यावर प्रखर टीका केली.