रोहित पवार हा जातीयवादी चेहरा ! जातीयवादी माणसाचं पार्सल पुन्हा बारामतीला पाठवा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर जिल्ह्यात ओबीसींचा महाएल्गार मेळावा सुरु आहे. यामध्ये आ. गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी समाजाला संबोधित केले. अहमदनगरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात बोलताना गोपीचंद पडळकर यांनी अनेक मुद्यांना हात घालत घणाघात केला.

त्यांनी यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाचा दाखला देत ज्याच्याकडे बुद्धी, बळ, चातुर्य आहे त्यांच्याकडे सत्ता स्थापन करण्याची ताकद असते असे म्हणाले. जर सत्तेचा माज असेल तर अशा सरकारला खाली खेचण्याचा अधिकार तुम्हा आम्हाला आहे असे ते म्हणाले.

त्यांनी यावेळी रोहित पवार यांच्यावर घणाघात केला. आ. रोहित पवार हे जातीयवादी चेहरा असल्याचे ते म्हणाले. रोहित पवार यांच्या अंगात रक्त नव्हे तर जातीयवाद वाहत आहे. अशा जातीयवादी माणसाचं पार्सल पुन्हा बारामतीला पाठवा. ते ओबीसींचे नसून जातीयवादी आहेत असा घणाघात त्यांनी केला.

मनोज जरांगे यांनी मंडळ आयोगला चॅलेंज काकरणार आहे असे वक्तव्य केले होते. त्यावरही त्यांनी टीका केली. मंडळ आयोगाने जे आरक्षण दिले ती म्हसोबाची खीर आहे का कि आम्ही घेतली आणि घरी आणली, अगदी तावून सुलाखून प्रक्रिया होऊन नऊ न्यायाधीशांनी आम्हाला आरक्षण दिले आहे. ते कुणीही चॅलेंज करू शकणार नाही असे पडळकर म्हणाले.

मराठा समाजाला कुणबी दाखले देणे व सगेसोयरे या शब्दावरून त्यांनी सरकारवरच निशाणा साधला. आपले हक्क मिळवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावेत व मंत्री छगन भुजबळ यांना पाठिंबा द्यावा,आल्या हक्कांचे रक्षण करावे असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.