अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2022 Ahmednagar News :- कर्जत-जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचे आजोबा म्हणजे सुनंदा पवार यांचे वडील मोहनराव नामदेवराव भापकर यांचं आज दुपारी वृद्धापकाळानं निधन झालं.
त्यांचा अंत्यविधी आज दुपारी ४:३० वाजता ढेकळवाडी, बारामती येथील भापकर वस्तीतील शेतात होणार आहे. भापकर यांच्या निधनामुळे आमदार पवार यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द करून बारामतीला धाव घेतली आहे. उद्या मंगळवारी होणारा त्यांचा सांगली-इस्लामपूर दौराही रद्द करण्यात आला आहे.