रब्बी हंगामासाठी 15 जानेवारीपासून आवर्तन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- मुळा धरणातून सिंचनासाठी रब्बी हंगामातील पहिले आवर्तन 15 जानेवारीपासून सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

रब्बी हंगामासाठी 15 जानेवारी ते 24 फेब्रुवारी तर उन्हाळी हंगामासाठी 10 मार्च ते 19 एप्रिल 10 मे ते 18 जून अशा रहाण्याची शक्यता आहे. पालकमंत्री हसन मूूूश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कालवा सल्लागार समितीची बैठक नगरला झाली. यावेळी अनेक अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान,जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे अन्य बैठकीत व्यस्त असल्याने त्यांना जलसंपदा अधिकार्‍यांनी बैठकीतील आवर्तनाच्या नियोजनाची माहिती दिली.

यावेळी माहिती देताना सांगितले कि, मुळा धरणात पिण्याचे व औद्योगिक वापराचे आरक्षित पाणी, तसेच बाष्पीभवन व (डेड स्टोक ) मृत साठा वगळता 14 हजार 500 दशलक्ष घनफूट पाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे.

धरणाच्या उजव्या – डाव्या कालव्यांद्वारे रब्बीत एक व उन्हाळी हंगामात दोन आवर्तनांचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. उजव्या कालव्याचे प्रत्येक आवर्तन 40 दिवस चालेल.

राहुरी, नेवासे, पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील 30 हजार हेक्टरचे सिंचन होईल. उजव्या कालव्यातून रब्बीसाठी चार हजार दशलक्ष घनफूट व उन्हाळी दोन आवर्तनांसाठी 9 हजार दशलक्ष घनफूट पाणी खर्च होईल.

डाव्या कालव्यातून रब्बीसाठी 500 दशलक्ष घनफूट व उन्हाळी दोन आवर्तनांसाठी एक हजार दशलक्ष घनफूट पाणी खर्च होईल. संभाव्य तारखा या रब्बी हंगामासाठी 15 जानेवारी ते 24 फेब्रुवारी तर उन्हाळी हंगामासाठी 10 मार्च ते 19 एप्रिल 10 मे ते 18 जून अशा रहाण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24