Ahmednagar News : विविध शासकीय योजना राबविल्याबद्दल व निकष पूर्ण केल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द गावाला आर.आर.पाटील “सुंदर गाव पुरस्कार” मिळाला.
महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखें पाटील यांच्या हस्ते गुरुवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सरपंच सोमनाथ आहेर व ग्रामपंचायत सदस्यांसह प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला.
मांडवे खुर्द गावामध्ये सरपंच सोमनाथ आहेर यांच्या खंबीर नेतृत्वात गावात विविध विकास कामांचा डोंगर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या साथीने ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या सोबतीने शुभारंभ झाला.
शासनाच्या विविध योजना गावामध्ये राबविण्यात आल्या. मूलभूत सुविधा त्याचप्रमाणे सार्वजनिक लोक हिताची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली. गावांतील अंतर्गत रस्ते जिल्हा परिषद शाळा बांधकाम, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत पानंद रस्ते, लोक सहभागातून वृक्ष लागवड,
वनविभाग अंतर्गत तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम सर्व गावांतर्गत सीसीटीव्ही कॅमेरे, सार्वजनिक शौचालये, रस्ता दुतर्फा हायमॅक्स दिवे, जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या मार्फत गावाला शुद्ध पाणीपुरवठा आदी प्रकल्प गावात राबवण्यात आले.
यामध्ये सर्वच ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य यांची मोलाची साथ मिळाली. मांडवी खुर्द गावासह वाड्यावर रस्ते पाणी वीज शिक्षण आरोग्य या मूलभूत सुविधा पुरवण्यावर आम्ही भर दिला असून हे करत असताना शासनाच्या विविध पुरस्कार स्पर्धांमध्येही भाग घेतला.
त्यामुळे महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार गावाला मिळाले. हीच आमच्या कामाची पावती असल्याचे सरपंच सोमनाथ आहेर यांनी म्हटले आहे.