Ahmadnagar News : महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेवासा तालुक्यात तब्बल ८० कोटींची विविध विकासकामे मंजूर झाली. मात्र महायुती सरकार स्थापन होताच नेवासा तालुक्यातील या ८० कोटींच्या विकास कामांना स्थगिती देण्यात आली होती.
त्यातील १६ कोटींचे काम सुरू झाले असून आगामी काळात इतर निधीतील कामे सुरू होतील. असे आ. गडाख यांनी सांगितले.मुकींदपुर-गिडेगाव रस्ता कामाच देखील या कामात समावेश होता.
दोन वर्षापासून स्थगितीमध्ये अडकलेल्या नेवासा तालुक्यातील या सोळा कोटी रुपयांच्या विकास कामास अखेर मुहूर्त मिळाला. आ. शंकरराव गडाख यांच्या हस्ते भूमीपूजन करत रस्त्याच्या कामाला सुरूवात झाली. आ.गडाखांच्या न्यायालयीन लढ्यामुळे हे काम सुरू झाले आहे.
दरम्यान सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक निधी रोखत आ. गडाख यांनी कोंडी करण्याचा प्रयत्न महायुती सरकारने केल्याचा दावा समर्थकांनी केला आहे.राजकीय सूडबुध्दीतून अडविलेल्या विकास निधीमुळे नागरिकांची गैरसोय होत होती.
मात्र गडाखांनी न्यायालयीन लढा देत कामे सुरू करण्याचा निर्णय घेतला. सरकारकडून नेवासा तालुक्याला निधी देताना डावलेले जात असल्याची भावना आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात नेवासा तालुक्यात विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला. दरम्यानच्या काळात राज्यात सत्तांतर झाले. सत्तांतर झाल्यानंतर नेवासा तालुक्यातील विविध कामांना शासनाने स्थगिती दिली होती. स्थगिती उठवून ही कामे सुरू व्हावी यासाठी आ. गडाख यांनी न्यायालयात दाद मागितली.
त्यानंतर स्थगिती उठल्यानंतर हे काम सुरू झाले आहे. विकास कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती आ. शंकरराव गडाख यांनी दिली. आ. गडाख यांच्या न्यायालयीन लढ्यानंतरच ही कामे सुरू होत असल्याने त्या-त्या गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा निवडणूक प्रचारावेळी आ. गडाखांनी येथील गावकऱ्यांना रस्त्याचे काम करण्याचा शब्द दिला होता.