अहमदनगर बातम्या

मोहटा देवीच्या दर्शनासाठी नियमावली… “नो मास्क,नो दर्शन”

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 29 सप्टेंबर 2021 :- नवरात्रोत्सव जवळ येऊ लागला आहे. मात्र कोरोनाची धास्ती कायम असल्याने या उत्सवावर देखील नियमांचे बंधन कायम असणार आहे.

दरम्यान राज्य सरकारच्या आदेशानुसार पाथर्डी तालुक्यातील मोहटा देवस्थानमध्ये अनेक निर्बंध कायम ठेऊन नवरात्रोत्सव होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने “नो मास्क,नो दर्शन” या नियमांचे काटेकोर पालन केले जाणार आहे. तसेच मिरवणूक, महाप्रसाद वाटप, मंदिर परिसरात घटी बसणे यासह सार्वजनिक उत्सवांना प्रतिबंध करण्यात आला आहे.

आगामी नवरात्रोत्सव पासून मोहटादेवी मंदिर देवस्थान खुले करण्यासाठी समितीच्या सभागृहात प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. करोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर मंदिर उघडणार असल्याने भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू शकते असे गृहीत धरून संरक्षण व पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे.

दरम्यान यावेळी बोलताना प्रांताधिकारी केकाण म्हणाले, नवरात्र काळात देवीच्या गाभाऱ्यात मध्ये जाऊन दर्शन सुविधा पूर्णपणे बंद करण्यात येऊन भाविकांनी रांगेत येऊन सामाजिक अंतराचे पालन करत दर्शन घेऊन निघून जायचे आहे. भाविकांना गडावर अथवा भक्त निवास मध्ये मुक्काम करता येणार नाही.

पाथर्डी शहरातून देवी गडाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर फिरते पोलीस पथक, तात्पुरती रस्ता दुरुस्ती, मार्गदर्शक सूचनांचे फलक असतील. शासकीय कर्मचारी, पोलिस, देवस्थान समितीचे कर्मचारी अशा सर्वांची करोना चाचणी आवश्यक असून लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी केली जाईल.

देवी दर्शनासाठी पायी चालत येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता पाथर्डी शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे, टपऱ्या, नवरात्रोत्सवासाठी पालिका व पोलिसांच्या संयुक्त कारवाई द्वारे हटविण्यात येऊन भाविकांसाठी रस्ता पूर्णपणे खुला ठेवावा.

मोहटादेवी मंदिर परिसरात खाजगी जागा मालक पार्किंगसाठी मनमानी दर आकारून भाविकांची लूट करतात. अशा तक्रारी नवरात्रीमध्ये वाढतात. ग्रामपंचायत, पोलिस व वन विभागाने संयुक्त निर्णय घेऊन पार्किंगचे दर ठरवावेत.

यात्रा व अन्य उत्सवा संदर्भात शासनाकडून अद्याप पर्यंत कोणत्याही मार्गदर्शक सूचना जारी झाल्या नसल्याने मंदिर उघडण्याबाबत बैठकीतून विचारविनिमय करण्यात आला. नवरात्र उत्सवासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून आलेल्या आदेशानंतर अंतिम आराखडा तयार होईल. असे केकाण म्हणाले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office