अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- सहकार संस्था चालवणे आणि ती उभी करणे एवढं सोपं नसतं ते जबाबदारीने करावं लागतं. असे मत जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.
पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथे विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा मंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेनेचे नेते औटी व काशिनाथ दाते यांचे आग्रहाखातर पारनेर तालुक्यातील विविध पाझर तलाव दुरुस्तीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक निधी हा पारनेर तालुक्यात दिला आहे.
यापुढेही काळामध्ये देखील पारनेर तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या मोर्चेबांधणीसाठी प्रयत्न करणार असून, तालुक्याला निधी कमी पडू देणार नाही. मी वयाच्या २४ व्या वर्षी कारखान्याचा चेअरमन झालो.
सहकारी संस्था चालवण्याचा कुठलाही अनुभव पाठीशी नव्हता. परंतु गडाख साहेबांच्या आशीर्वादाने सर्वसामान्य जनतेच्या पाठिंब्याने मी सहकारात काम करण्यास यशस्वी झालो. सहकार संस्था चालवणे आणि ती उभी करणे एवढं सोपं नसतं ते जबाबदारीने करावं लागत.असा टोला विरोधकांना लगावला.