अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवशी इच्छूक उमेदवारांनी १५३ अर्ज नेले.
तर बिगरशेती मतदार संघातून सबाजी गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. येत्या २५ जानेवारीपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ असल्याचे सांगण्यात आले.
बँकेच्या २१ संचालकांच्या जागांसाठी येत्या २० फेबु्रवारीला मतदान होणार आहे. बँंकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या वर्तुळातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.