सोशल मीडियावरून साई भक्तांची फसवणूक केली मात्र आता…?

Ahmednagar News: साईभक्तांची फसवणूक करणाऱ्या विविध संस्था व वेबसाईट्स तसेच सामाजिक माध्यमांवरील व्यक्तींविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संस्थानने पोलिसांना यादीच दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

साईबाबा संस्थान हे आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून ते नोंदणीकृत आहे. साई दर्शनासाठी देश- विदेशातून मोठ्या प्रमाणावर साईभक्त येत असतात. साईंची ख्याती जगभर असल्याने कोट्यवधी साईभक्त संस्थानची माहिती वेगवेगळ्या माध्यमातून शोधत असतात.

काही दिवसांपासून साईभक्तांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी संस्थानकडे आल्या होत्या. बनावट संस्था फेसबुक व इंस्टाग्राम अकाउंटच्या माध्यमातून साईबाबा संस्थानच्या नावाने डोनेशन मागत असल्याबाबतची माहिती मिळाली होती.

Advertisement

त्याबरोबरच साई समाधीचे विनापरवाना लाईव्ह दर्शन दाखवतात, असेदेखील निदर्शनास आले होते. त्यानुसार अशा प्रकारे भक्तांची फसवणूक करणाऱ्या अज्ञात कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय समितीने घेतला होता.

त्या अनुषंगाने आयटी विभागाचे वरिष्ठ अधिकारी अनिल शिंदे यांनीदेखील कारवाई करा, अशा सूचना दिलेल्या होत्या. आयटी विभागाचे कर्मचाऱ्यांनी अशा बनावट संस्थांचा १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत शोध घेतला.

त्यांना अनेक बनावट संस्था इंस्टाग्राम व फेसबुक अकाउंट लाईव्ह दर्शन देणाऱ्या, बदनामी करणाऱ्या वेबसाईट मिळून आल्या. त्याबरोबरच साईबाबा संस्थानच्या नावाने देणगी मागणाऱ्या संस्थादेखील निदर्शनास आल्या.

Advertisement

साईबाबा संस्थानचे नाव व त्याच्याशी साधर्म्य असलेल्या नावाचा वापर करून साई भक्तांकडून देणगी मागितली जात असल्याबाबतचे निदर्शनास आले. त्यामुळे शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.