अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :-जिल्ह्यातील शिर्डी येथील साई मंदिर संस्थानाने नगरपंचायतीचा येण्या – जाण्याचा मार्ग बंद केला आहे, यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
दरम्यान याबाबत समजलेली माहिती अशी कि, द्वारमाई मंदिराजवळून जाणारा नगरपंचायतीचा रस्ता साईसंस्थानने बंद केला. हा रस्ता नगरपंचायतीचा आहे. ग्रामस्थांच्या दृष्टीने बाजारपेठेतील महत्वाचा रस्ता आहे.
कुठलेही संयुक्तीक कारण नसताना साईसंस्थानने अडथळे उभे करून हा रस्ता बंद केला. नगरपंचायतीची विनंती ऐकण्याची तयारी संस्थानच्या अधिका-यांची नाही.
त्या भागातील रहिवाशांची मोठी गैरसोय होते आहे. अन्य लांबच्या रस्त्याचा वापर करण्याची वेळ आली आहे. नगराध्यक्ष अर्चना कोते यांनी विनंती करूनही हा रस्ता खुला केला जात नाही.
येत्या दोन दिवसांत हा रस्ता खुला झाला नाही तर भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल. असा इशारा पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिला.
दरम्यान हा रस्ता खुला करावा, या मागणीसाठी आज भाजपच्या वतीने नगरपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. या बाबत साईसंस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच.बगाटे व पोलीस उपाधिक्षक संजय सातव यांच्या सोबत चर्चा करून मार्ग काढू. तोपर्यत आंदोलन मागे घेण्याचा पर्याय त्यांनी मांडला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved