साईकृपाला गाळप परवाना देऊ नये

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदा येथील साईकृपा साखर कारखान्याला गाळपाचा परवाना देऊ नये.अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे यांनी निवेदनाद्वारे साखर आयुक्तांकडे मागणी केली आहे.

याबाबत माहिती देताना ते म्हणाले की २०१९२० यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी किंमत सदर कारखान्यानेअद्याप पर्यंत दिलेली नाही.

वेळोवेळी लोकशाही मार्गाने आंदोलने केली जिल्हाधिकारी व कारखाना यांच्या संयुक्त बैठकीत एफआरपी देण्याचे ठरले होते. परंतु साईकृपा कारखान्याने ही ची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही दिली नाही.

त्यामुळे श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, राहुरी येथील शेतकऱ्यांना एफ आरपीच्यावर पंधरा टक्के व्याज द्यावे. अन्यथा कारखान्याला २०२०,२१ चा गाळप परवाना देऊ नये.

अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना व उत्पादक शेतकरी हे कारखान्याच्या गव्हाणीत बसून आंदोलन करतील असा इशारा लोंढे यांनी दिला आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24