‘सकल मराठा समाज’ 10 ऑक्टोबरला करणार ‘असे’ काही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :-मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. विरोधकांनी राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. परंतु या सर्व घडामोडींमुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे.

अशा परिस्थितीत राज्य सरकारने तातडीने पावले उचलून काही बाबींवर त्वरीत कार्यवाही करावी, यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत राज्यसरकारने तातडीने पावले उचलून काही बाबींवर त्वरीत कार्यवाही करावी,

या मागणीचे निवेदन श्रीरामपूर शहर व तालुका सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने तहसील कार्यालयात देण्यात आले. तसेच 10 ऑक्टोबरला शहरातील प्रशासकीय भवन येथे शहर व तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही म्हटले आहे.

यावेळी डॉ.अरविंद बडाख, बाबासाहेब भांड, मुकुंद लबडे, दत्तात्रय कांदे, बाळासाहेब लोंढे, शरद भांड आदी मराठा समाज बांधव उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने दि.9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा आरक्षण अंमलबजावणीला स्थगिती दिल्याने मराठा समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

अशा परिस्थितीत राज्य सरकारने तातडीने पावले उचलून त्वरीत कार्यवाही करणे आवश्यक आहे. त्यात प्रामुख्याने, एसईबीसी प्रवर्गातून शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज केलेल्या मराठा विद्यार्थ्यांची हानी टाळण्यासाठी राज्य सरकारने आपल्या नियंत्रणाखालील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये 12 टक्के जागा मराठा विद्यार्थ्यांसाठी वाढवाव्यात.

या मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने मराठा आरक्षणास संरक्षण देण्यासाठी संसदेत स्वतंत्र कायदा करावा. मराठा समाजास ईडब्ल्यूएसमध्ये नव्हे तर हक्काचे स्वतंत्र आरक्षण मिळाले पाहिजे. दि.9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस स्थगिती आदेश देण्यापूर्वी सुरू झालेल्या

शैक्षणिक प्रवेश व नोकरभरती प्रक्रियांमध्ये मराठा समाजातील एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्त्या व लाभ देण्यात यावेत. या बाबी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे असेही यात म्हटले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24