अहमदनगर Live24 टीम,29 जुलै 2020 :-राज्यातील काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन सप्टेंबर 2020 पर्यंतचे वेतन ऑफलाईन करण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने जारी केले आहेत.
राज्यातील ज्या अंशतः व पूर्णतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील व अध्यापक विद्यालयातील ज्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांना शालार्थ क्रमांक दिलेला नाही त्यांचे वेतन या पद्धतीने होणार आहे. * असे असेल देयक
- – १) 13 मार्च 2018 च्या शासन निर्णयानुसार वैयक्तिक मान्यता दिलेल्या 276 शिक्षकांचे व उच्च माध्यमिक शाळांमधील पुरवणी मागणीद्वारे मान्य केलेल्या 171 शिक्षकांचे वेतन.
- २) 6 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील खाजगी अनुदानित, उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील सन 2003-04 ते 2010-11 या वर्षातील उच्चस्तरीय समितीने मान्यता दिलेल्या 1000 पदांपैकी व्यपगत केलेल्या 428 पदांपैकी पुनरूज्जिवित केलेल्या 68 पदांचे वेतन.
- ३) 1 जुलै 2016 व 2 जुलै 2016 च्या शासन निर्णयानुसार अनुदानासाठी पात्र घोषित केलेल्या एकूण 8970 शिक्षक-कर्मचार्यांचे वेतन. 19 सप्टेंबर 2016 अन्वये अनुदानास पात्र घोति केलेल्या 1628 शाळा,
- 2452 तुकड्यावरील 19247 शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांना अनुदान मंजूर केले असून त्यापैकी 1266 शाळा व 1680 तुकड्यांवरील प्रत्यक्ष अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे वेतन.
- ४) 5 जानेवारी 2019 शासन निर्णयामधील पात्र ठरलेल्या 36 माध्यमिक विद्यालयातील 181 शिक्षक व 127 शिक्षकेतर तसेच 11 माध्यमिक शाळांच्या तुकड्यावरील 41 शिक्षक असे एकूण 222 शिक्षक व 127 शिक्षकेपदांना तसेच अन्य शिक्षकांना 1 एप्रिल 2018 पासून 20 टक्के अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
-
-
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com