Ahmednagar News : नगर जिल्ह्यात दारू पिण्याचे प्रमाण वाढल्याचे आढळून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मद्य विक्रीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विदेशी दारूची विक्री ९ टक्के, तर बिअरची विक्री ११ टक्क्यांनी वाढली आहे.
देशी दारूची विक्री मात्र मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे. तर विदेशी दारूची विक्री वाढली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी ३ कोटी १ लाख ९५ हजार ८७८ लिटर दारू पिणाऱ्यांनी रिचवली आहे. पण जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दारू विक्री वाढली आहे. दारू विक्रीतून शासनाला महसूल मिळतो. त्यामुळे दारुबंदी ही कागदावर असल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्यावर्षी मद्यपींनी २ कोटी ८७ लाख ४० हजार ७६९ लीटर दारू रिचवली होती. यंदा त्यात वाढ झाली असून सुमारे १४ लाख ५५ हजार १०९ लीटर जास्त दारु रिचवली आहे. त्यामुळे एकूण ३ कोटी १ लाख ९५ हजार ८७८ लिटर दारूविक्री झाली.
गेल्यावर्षीच्या तुलनेत विदेशी दारू व बिअरच्या विक्रीत यंदा मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी ९२ लाख ४ हजार २३७ लीटर विदेशी मद्यविक्री झाली होती. यंदा त्यात वाढ झाली असून ९९ लाख ४६ हजार २६ लीटर दारू विकली गेली. वाढीचे प्रमाण ८ टक्के आहे. तर बिअर विक्रीत ११ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी ६० लाख ६६ हजार ७८० लीटर बिअरची विक्री झाली होती. यंदा ६७ लाख ३२७ हजार २४७ लीटर बिअरची विक्री झाली.
जिल्ह्यात देशी दारू पिणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. मागील वर्षी १ कोटी ३२ लाख ७० हजार ७०७ लीटर देशी दारुविक्री झाली. यंदा त्यात ०.२५ टक्के वाढ झाली आहे. १ कोटी ३३ लाख ४ हजार ५०६ लीटर देशी दारु जिल्ह्यात रिचवली आहे