अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- वारकरी संप्रदायाकडे तरुणांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण तरुण टिकला तरच देश टिकेल आणि म्हणून तरुणांनी संप्रदायाची तत्व अंगीकरावे.
तरुणांनी परमार्थाकडे येण काळाजी गरज आहे, असे प्रतिपादन इंदुरीकर महाराज यांनी केले. जामखेड तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, व्यसनापासून दूर रहावे, मोबाईलचा वापर करू नये, मोबाईलच्या अतिवापरामुळे नैराश्य आणि आत्महत्येपर्यंत तरुणांची उडी चाललेली आहे.
परंतु हे बरोबर नाही घर,गाव,देश टिकावा असं वाटत असेल तर मोबाईलचा अति वापर करू नये, आई-वडिलांना जीव लावा. व्यसनापासून दूर रहावे आणि सगळ्यात महत्त्वाचे कष्टाला पर्याय नाही, कष्ट केले तरच आपलं भवितव्य आहे.
आपण एक रुपया कमवत नाही परंतु महागडा मोबाईल वापरतो हे बरोबर नाही. तुम्ही कमवा आणि नंतर पन्नास हजाराचा मोबाईल घ्या, परंतु दुसऱ्याच्या जीवावर नको.
सोशल मिडियाचा वापर कमी करावा असा उपदेश महाराजांनी केला. रामायणातील प्रसंग सांगताना रावणाने रामच्या हातुन मरण्याकरीताच सीतामातेला चोरुन आणले होते,
सीतेला चोरण्याकरिता गेलो तेव्हा माय म्हणालो म्हणून माय शब्दाला जागण्याकरिता त्याने सीतामातेला हातसुद्धा लावला नाही. यातुन परनारी विषयी तुम्ही मातृत्व भावना ठेवा, असा उपदेश महाराजांनी या ठिकाणी केला.