वाळूतस्करांना ठोठावला १९ लाखांचा दंड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील प्रवरा नदीपात्रात महसूलच्या पथकाने कारवाई करत जेसीबी आणि डंपर ताब्यात घेतला. तहसीलदार अमोल निकम यांनी तिघांना १९ लाख ११ हजार ९६० रुपयांचा दंड ठोठावला.

ही कारवाई बुधवारी सकाळी ६.३० वाजता करण्यात आली. तलाठी योगिता शिंदे (खांडगाव), संग्राम देशमुख (आश्वी), संजय शितोळे (उंबरी बाळापूर) यांच्या पथकाने नदीपात्र गाठताच वाळूतस्कर पळून गेले.

जेसीबी व हायवा डंपर (एम. एच. १७ बी. वाय. २००२) पथकाने ताब्यात घेतला. जेसीबी मालक चेतन साकुरेला ७ लाख ५० हजार, डंपरमालक राहुल गुंजाळला ३ लाख ६० हजार ६६० तर २० ब्रास वाळूचे बेकायदा उत्खनन करणारा संतोष नंदू ढगे याला ८ लाख १ हजार ३०० रुपयांच्या दंडाच्या नोटिसा बजावण्यात आल्या.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24