अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-संगमनेर परिसरात वाळू तस्करी सुरूच असुन काल संगमनेर शहर पोलिसांनी पहाटे ४.३० च्या सुमारास संगमनेर-नाशिक रस्त्यावर शेतकरी पेट्रोल पंपासमोर छापा टाकून महिंद्रा कंपनीचा लाल ट्रॅक्टर व त्याला जोडलेली लाल रंगाची ट्रॉली त्यात चोरीची शासकीय वाळू पकडली.
पोकॉ ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहन भिमाजी जेडगुले, रा. सायखिंडी फाटा, संगमनेर, शहेबाज शेख, रा. रहमतनगर, संगमनेर,
इस्माईल पठाण उर्फ भैय्या ,रा. संगमनेर यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन हेकॉ टोपले हे पुढील तपास करीत आहेत.