Ahmednagar News : नगर शहर व केडगाव हे उपनगर. महापालिकेत समाविष्ट असणारे भाग. नगर शहराचे ठिकाण असल्याने विविध विकासकामे असोत किंवा राजकीय समीकरणे असोत याचा सर्व उदय नगर शहरातूनच व्हायचा.
त्यामुळे बऱ्याचदा केडगाव हे दुर्लक्षितच राहिले. सुरवातीला केडगाव ही ग्रामपंचायत होती त्यानंतर तिचा महापालिकेत समावेश झाला. परंतु रस्ते असो की पाणी प्रश्न या समस्या कधी केडगावकरांच्या सुटल्या नाहीत. परंतु काळाच्या ओघात केडगावमध्ये एक तारा, राजकीय नेतृत्व उदयाला आलं ते म्हणजे संदीप भानुदास कोतकर.
केडगावकरांचा हक्काचा माणूस, सर्वानाच मोठ्या भावाप्रमाणे वाटणारा व त्याच हक्काने सर्वांचे प्रश्न सोडवणारा चेहरा असल्याने त्यांना सर्वांनीच प्रेमाने ‘दादा’ म्हणायला सुरवात केली. ते लोकप्रिय संदीपदादा झाले.
ते नगरसेवक म्हणून निवडून आले व महापौर झाले. त्यानंतर मात्र केडगावचा चेहरा मोहराच बदलला. संदीप दादांनी सर्वच विकासाचे उपक्रम केडगावात राबवले. केडगाव एक प्रगत उपनगर बनवले.
केडगाव पाणी योजनेचे जनक
संदीप दादा कोतकर यांना केडगाव पाणी योजनेचे जनक म्हणतात. केडगाव हे शहरात गेले, महापिकेत गेले तरी केडगावचे विकासाचे स्वप्न मात्र पूर्ण होत नव्हते. कर वाढले तरिही केडगावच्या पाणीप्रश्नाची साडेसाती कधीच सुटली नाही.
पण सन २००६ मध्ये संदिप भानुदास कोतकर हे केडगावचे नगरसेवक झाले व अडिच वर्षानंतरच नगर शहराचे महापौर देखील बनले. त्यानंतर त्यांनी प्रथम केडगावचा पाणी प्रश्न सोडवण्यावर भर दिला. त्यांनी सर्वात आधी दिवगंत केंद्रिय मंत्री विलासराव देशमुख यांच्या
माध्यमातुन लहु व मध्यम शहराच्या विकास योजनांचा अभ्यास करून २००८ मध्ये केडगावच्या नव्या पाणी योजनेची मुहूर्तमेढ रोवली. फेज १ म्हणजे केडगावची सुधारीत ४४ कोटी रूपयांची पाणी योजना सुरु झाली व केडगावकरांचे पाण्याचे प्रश्नच मिटले. त्यामुळे लोक त्यांना केडगाव पाणी योजनेचे जनक असेही म्हणतात.
विविध विकासकामे
पाणी प्रश्न सोडवण्याबरोबरच त्यांनी रस्त्यांसह विविध विकासकामांना सुरवात केली. त्यांनी केडगाव शहर नगर शहराच्या बरोबरीने बनवले. वीज, पाणी रस्ते हे प्रश्न प्रकर्षाने सोडवले. त्यामुळे केडगावात विविध उद्योग, व्यवसायांचा विकास झाला.
आज केडगावचे जे प्रगत रूप दिसते त्यामागे संदीप कोतकर यांचा सिंहाचा वाटा आहे असे लोक म्हणतात.
राजकीय गणिते
संदीप दादा कोतकर यांची लोकप्रियता वाढली. त्यांची लोकप्रियता व त्यांचे वडील सन्मानीय भानुदासजी कोतकर साहेब यांची राजकीय ध्येयधोरणे यामुळे राजकारणातील समीकरणे बदलली. नगर शहर हे राजकीय केंद्र न राहता राजकीय समीकरणे केडगाव भोवती फिरू लागली.
त्यांना जनाधार असल्याने अनेक गोष्टी शक्य झाल्या. पुढे जाऊन संदीप दादा किंवा सन्मानीय भानुदासजी कोतकर साहेब जे सांगतील ते राजकीय क्षेत्रात होऊ लागले. अनेक नगरसेवक केवळ साहेबांनी उभे केले आहेत म्हणून निवडून येऊ लागले.
कारण हा माणूस ज्या अर्थी कोतकर यांनी उभा केला म्हणजे तो नक्कीच विकास करेल अशी भावना लोकांमध्ये दृढ झाली. त्यामुळे संदीपदादा कोतकर यांच्या भोवती राजकीय समीकरणे फिरू लागली.
राजकीय एंट्री?
आज संदीप दादा कोतकर यांचा वाढ दिवस आहे. आज त्यांचे चाहते, कार्यकर्ते, भरभरून प्रेम करणारी जनता आज त्यांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरी करणार आहे. आपल्या ‘दादांचा’ वाढदिवस केडगावकर जल्लोषात करतील यात शंका नाही.
मग आता ही दादांची राजकीय एंट्री आहे का? अशी चर्चा सध्या सुरु आहे. दादा राजकारणात सक्रिय होणार अशी चर्चा सध्या कार्यकर्ते करत आहेत. असे जर झाले तर पुन्हा एकदा राजकीय समीकरणे बदलतील हे नक्की.
सत्तास्थानांना शह?
सध्या शहरातील सत्ता, राजकारण ज्या कुणाभोवती केंद्रित असेल तर ती गणिते बदलतील असे लोक म्हणत आहेत. कारण दादांची राजकीय एंट्री झाली तर नक्कीच जनतेचा ओढा दादांकडेच येईल असे कार्यकर्ते सांगत आहेत.
तसेच दादा हे भावी आमदारकीसाठीही उभे राहतील अशी इच्छा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. असे जर झाले तर शहरातील सत्तास्थाने बदलतील का? राजकीय गणिते पुन्हा केडगावाभोवती फिरतील का? हे मात्र आगामी येणारा काळच सांगेल.