दोस्त दोस्त ना रहा …त्या सराफला मित्रानेच लुटले !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

 

संगनेरमधील सराफावरील दरोडा व खुनाचा गुन्हा चार दिवसांत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला असून याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सराफ व्यावसायिकावर मित्रानेच इतर साथीदारांच्या मदतीने दरोडा टाकण्यास सांगितले होते. या प्रकरणी तिघा जणांना अटक करण्यात आली आहे.

गणेश राजेंद्र गायकवाड (वय ३३, रा. घुलेवाडी, संगमनेर), नाशिकमधील दीपक विनायक कोळेकर, भरत विष्णू पाटील अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर अविनाश जगन्नाथ मारके (रा. घुलेवाडी), समाधान गोडसे (रा. सोलापूर) व नीलेश (पूर्ण नाव नाही) हे तिघे फरारी असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. 

संगमनेरमधील ज्ञानेश्वर अनिल चिंतामणी दुकान बंद करून सोने व चांदीचे दागिने बॅगमध्ये घेऊन कारमधून जात होते. त्याचवेळी एका कारमधून आलेल्या तिघांनी चिंतामणी यांच्या गाडीची काच फोडून तीन किलो चांदीचे दागिने असलेले बॅग चोरली होती, त्या वेळी सराफाच्या मदतीला आलेल्या अविनाश शर्मा या तरुणावर दरोडेखोरांनी गावठी पिस्तूलमधील गोळीबार करून शर्मा यांचा खून केला होता. 

गणेश गायकवाड सराफ व्यावसायिक चिंतामणी यांचा मित्र आहे. चिंतामणी सायंकाळी दुकान बंद करून घरी जात असल्याची माहिती गणेशला माहिती होते. त्यानुसार गायकवाड, अविनाश मारके या दोघांनी मारके याच्या घरी चिंतामणी यांना लुटण्याचा कट आठ दिवसांपूर्वी रचला होता. 

त्यानंतर गणेश चिंतामणी यांचे लोकेशन देईल, असे ठरले होते. त्यानुसार ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी गायकवाड चिंतामणी यांच्या दुकानात सायंकाळी गेला होता. त्या वेळी चिंतामणी यांच्या दुकानात एक चांदीची अंगठी खरेदी केली. त्यानंतर चिंतामणी दुकान बंद करून दागिन्यांची बॅग गाडीतून घेऊन घरी जात होते. 

त्या वेळी गायकवाड याने इतर साथीदारांना फोन करून चिंतामणी येत असल्याची माहिती दिली. चिंतामणी घरापर्यंत येत असताना तिघांनी पाठलाग केला. चिंतामणी घरी आल्यानंतर त्यांच्या गाडीची तिघांनी काच फोडली. 

दागिन्याची एक पिशवी तिघे जण घेत असताना इतर काही नागरिक सराफ व्यवसायिकाच्या मदतीला आले. त्याच वेळी अविनाश मारके याने आपल्याकडील गावठी पिस्तूलने तीन जणांच्या दिशेने गोळीबार केला. त्यात एकाचा मृत्यू झाला होता.

 

अहमदनगर लाईव्ह 24