संगमनेर बनतोय गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा ‘हॉटस्पॉट’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- संगमनेर मध्ये गुटखा तस्करीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. अनेकदा कारवाई होऊनही गुटख्याची तस्करी सुरूच आहे. नुकतेच एका कारमधून २ लाख २२ हजारांच्या गुटख्यासह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ मंगळवारी नगरच्या अन्न व औषध प्रशासनाने केली. संजय लुंकड यावर गुन्हा दाखल केला असून न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कारमधील हिरा पानमसाला, रॉयल सुगंधी तंबाखूचा २ लाख २२ हजार ६०० रुपयांचा गुटखा व २ लाखांची कार ताब्यात घेण्यात आली.

अन्न व औषध विभागाचे अधिकारी उमेश राजेंद्र सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून संजय बाबुलाल लुंकड (४७, घुलेवाडी) याच्यावर तालुका पोलिसांनी अन्न व सुरक्षा व मानके कायदान्वये गुन्हा दाखल केला. तपास सहायक फौजदार इस्माईल शेख करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24