अहमदनगर बातम्या

संगमनेर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडून टाळे ठोकले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवरून आधीच देशात संतापाचे वातावरण आहे. यातच राज्यासह नगर जिल्ह्यात देखील याचे पडसाद उमटू लागले आहे.

शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी मिळालीच पाहिजे.” अशा घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या राहुरी फॅक्टरी येथील शेतकी कार्यालयात घुसले.

कार्यालयातील एक फाईल व काही कागदपत्र घेऊन बाहेर आले. संगमनेर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात कोंडून, रवींद्र मोरे यांनी कार्यालयाला कुलूप ठोकले.

कार्यालयाबाहेर कारखान्याची फाईल व कागदपत्रे जाळून टाकली. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा अंगिकारला आहे.

नगर जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी येत्या २०२१-२२ गाळप हंगामात शेतकऱ्यांना किती ऊस दर देणार? हे अद्याप जाहीर केलेले नाही.

कारखान्यांचा गळीत हंगाम दिवाळी सणा नंतर सुरू होईल. नेतेमंडळी ऊस दराची कोंडी फोडून, एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा करीत नाहीत.

तोपर्यंत जिल्ह्यातील त्यांचे साखर कारखाने सुरू करू देणार नाही. त्यासाठी ठिकाणी तीव्र आंदोलने छेडली जातील. असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

Ahmednagarlive24 Office