अहमदनगर बातम्या

Sangamner News : संजय गांधी निराधार योजनेसह विविध प्रलंबित प्रकरणे मार्गी लावा !

Published by
Ahmednagarlive24 Office

संगमनेर (प्रतिनिधी)–संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असूनही लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विविध गावांमधील योग्य लाभार्थ्यांना शासनाच्या सुविधांचा लाभ मिळवून दिला आहे.

मात्र मागील अनेक दिवसांपासून लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली अनेक प्रकरणे प्रलंबित असून ते तात्काळ मार्गी लावून तालुक्यातील निराधार ,वृद्ध व गोरगरीब , नागरिकांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

प्रांताधिकारी कार्यालय येथे काँग्रेसने विविध प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावे याकरता निवेदन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, गणेश मादास ,नितीन अभंग, किशोर पवार,

गजेंद्र अभंग, शैलेश कलंत्री ,जालिंदर लहामगे, विजय उदावंत ,दशरथ भुजबळ ,रमेश नेहे, संजय कानवडे, सुभाष दिघे ,सौदामिनी कान्होरे, सुनीता कांदळकर, किशोर बोऱ्हाडे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

या निवेदनात म्हटले आहे की काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली गोरगरिबांसाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला. मात्र मागील काही महिन्यांमध्ये अनेक प्रकरने प्रलंबित ठेवली गेली.

त्यामुळे तालुक्यातील वृद्ध नागरिक निराधार गोरगरीब यांची मोठे हाल झाले आहेत. संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध काळ योजना यामधील अनेक प्रकारचे प्रलंबित असून

तातडीने ही सर्व प्रकरणे मंजूर करावी त्याचप्रमाणे या प्रकरणांच्या कामी दाखल्याची अट 21 हजारांवरून 50 हजार रुपये करण्यात यावी. त्यामुळे वंचित असलेल्या लाभार्थी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडीअडचणी सोडवण्यासाठी मोठी मदत होईल.

यावेळी सौ दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, समाजातील निराधार ,अपंग, वृद्ध व्यक्तींना औषध उपचाराची गरज असते आणि त्याकरता या योजना त्यांच्याकरता अत्यंत महत्त्वपूर्ण असतात.

मात्र मागील काही दिवसांपासून या योजनांमधून लाभार्थ्यांना पैसे न मिळाल्याने या नागरिकांची हाल होत आहे. तरी तातडीने सर्व प्रकरणे मंजूर करावी अशी मागणी त्यांनी केली

तर संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष गजेंद्र अभंग म्हणाले की संजय गांधी योजनेचे साडेनऊशे प्रकार ने प्रलंबित आहेत. ते तातडीने मंजूर करून निराधार व्यक्तींना लाभ द्यावा अशी मागणी त्यांनी केली. याप्रसंगी काँग्रेसचे विविध पदाधिकारी, व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office