अहमदनगर बातम्या

संगमनेरात कत्तलखान्यांवर पोलिसांचा छापा, पावणे दोन लाखाचे गोमांस पकडले

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शहरातील मदिनानगरमधील एका वाड्यावर शहर पोलिसांनी नुकताच छापा टाकला. यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल होत असल्याचे आढळून आले. या छाप्यात पोलिसांनी सुमारे पावणेदोन लाख रुपये किंमतीचे ७०० किलो गोमांस जप्त केले आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीबरुन फरिद जावेद कुरेशी (रा.जमजम कॉलनी, संगमनेर) याच्याविरुद्ध येथील शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना शहरातील मदिनानगर भागामध्ये एका स्कूलच्या पाठीमागे एका वाड्यात फरीद जावेद कुरेशी ही व्यक्‍ती जिवंत गोवंश जनावरांची कत्तल करत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यामुळे पोलीस निरीक्षक मथुरे यांनी तात्काळ ‘पोलीस पथकाला संबंधित ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव तसेच पोलीस कॉन्स्टेबल कानिफनाथ जाधव, दाभाडे, गवळी, उगले यांच्या पथकाने छापा टाकला असता तेथे मोठ्या भ्रमाणात जिवंत गोवंश जनावरांची कत्तल केल्याचे आढळून आले.

तर छाप्याची चाहूल लागल्याने कत्तलखाना चालक अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिसांनी घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी संगमनेर यांना बोलवून घेतले आणि सदर गोवंश मांसाची तपासणी केली असता सुमारे ७०० किलो वजनाचे १ लाख ७५ हजार रुपयांचे गोबंश मांस तेथे आढळून आले.

पोलीस तपासात पळून जाणाऱ्या व्यक्तीचे नाब फरीद जावेद कुरेशी (रा. जमजम कॉलनी, संगमनेर ) असे असल्याचे निष्पन्न झाले असून घटनास्थळावरून पोलीस पथकाने सुमारे पावणे दोन लाख रुपये किंमतीचे ७०० किलो गोवंश जनावरांचे गोमांस ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गायकवाड करीत आहे.

Ahmednagarlive24 Office