संत रविदास विकास केंद्रासाठी निधी कमी पडू देणार नाही -आ. संग्राम जगताप

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  संत रविदास महाराज यांचे कार्य संपुर्ण समाजाला दिशा दर्शक आहे. त्यांच्या नावाने शहरात उभे राहणारे विकास केंद्र समाजाच्या विकासात्मक वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावणार असून, यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नसल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली. 

शहरात संत रविदास विकास केंद्र उभारणीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी जागा व 50 लाखाचा निधी सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिल्याबद्दल चर्मकार विकास संघ व चर्मकार समाजाच्या वतीने आमदार जगताप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

कार्यक्रमाप्रसंगी चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, प्रदेश सचिव प्रा.सुभाष चिंधे, डॉ.सागर बोरुडे, वधु-वर मेळाव्याचे अध्यक्ष इंजी. तुकाराम गायकवाड, अरविंद कांबळे, श्रीपती ठोसर, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष सुभाष मराठे, आदिनीथ बाचकर, रुख्मिणीताई नन्नवरे, संभाजी साळे, भारत चिंधे, 

देवराम तुपे, विलास जतकर, संजय साळवे, नानासाहेब शिंदे, अभिमन्यू चव्हाण, भाऊसाहेब आंबेडकर, विक्रम गुजर, भास्कर सोनवणे, एकनाथ नन्नवरे, गंगाराम साळवे, पाराजी साळे, इंजी. दत्तात्रय क्षीरसागर, मिनाक्षी साळवे, जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, अरुण आहेर, लता वाघमारे, मिनल माने, सर्जेराव गायकवाड, मधुकर घनदाट, राजेंद्र धस, मच्छिंद्र दळवी आदी उपस्थित होते. 

आमदार जगताप पुढे म्हणाले की, चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून संपुर्ण राज्यात संजय खामकर यांनी मोठे सामाजिक कार्य उभे केले आहे. समाजाला एकत्रित करुन दिशा देण्याचे कार्य ते करीत असून, या कार्याला सर्व समाजबांधवांनी पाठबळ देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रदेशाध्यक्ष संजय खामकर म्हणाले की, संत रविदास विकास केंद्र चर्मकार समाजातील युवक-युवतींसाठी परिवर्तनाची नांदी ठरणार आहे. युवकांसह महिला सक्षमीकरणासाठी या केंद्राच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे. समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आनण्यासाठी चर्मकार विकास संघ कटिबध्द असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

शहरातील प्रभाग क्रमांक 1 मधील नगर-मनमाड रोड सावेडी भागात अर्धा एकर जागेवर संत रविदास विकास केंद्र उभे राहत आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्याने या प्रकल्पासाठी सामाजिक न्याय विभागाचा 50 लाखा निधी उपलब्ध झाला असून, लवकरच याचे भूमीपूजन होणार आहे. दोन हजार व्यक्तींची क्षमता असलेले सभागृहासह प्रशस्त जागेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

या केंद्राच्या माध्यमातून युवक-युवतींना स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, अभ्यासिका, स्वयंरोजगारासाठी कौशल्यपुर्ण प्रशिक्षण, महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन शिबीर, युवकांसाठी उद्योग व व्यवसायासाठी मार्गदर्शन, आरोग्य शिबीर, ज्येष्ठ नागरिकांसाठी योग केंद्र, शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शनसाठी उपयोग करण्यात येणार आहे.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24