अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात नुकत्याच ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या आहेत. यामुळे सर्वांचे लक्ष सरपंच आणि उपसरपंच यांच्या निवडीच्या कार्यक्रमावर लागून राहिलेलं होते.
मातर आता प्रतीक्षा संपली आहे, कारण जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सरपंच आणि उपसरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
या कार्यक्रमानूसार जिल्ह्यातील ७६५ ग्रामपंचायतींवर ९ आणि १० फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंच यांची निवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मुदत संपणार्या ७६७ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारीला पारपडल्या.
दरम्यान ग्रामविकास विभागाच्या ९ मार्च २०२० च्या आदेशानूसार ग्रामपंचायत सरपंच पद हे २०२० ते २०२५ या कालावधीसाठी पाच वर्षासाठी आरक्षण काढण्यात आलेले आहे.
त्यानूसार २२ जानेवारीला जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पुढील पाच वर्षाच्या सोडती काढण्यात आलेल्या आहेत. या आरक्षणानूसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ९ आणि १० फेब्रुवारीला सरपंच आणि उपसरपंच यांची निवड करण्यात येणार आहे.
तालुकानिहाय सरपंच:- नगर ५९, श्रीरामपूर २७, राहुरी ४४, नेवासा ५९, शेवगाव ४८, अकोले ५२, संगमनेर ९४, कोपरगाव २९, राहाता २५, पाथर्डी ७८, जामखेड ४७, पारनेर ८८, श्रीगोंदा ५९ असे आहेत.