अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-गुंडेगाव येथील वनखात्याचा सातबारा लवकरच बाहेर काढणार असून जो कामे करतो त्यालाच टीका करण्याचा अधिकार असतो फालतू लोकांना मी महत्व देत नसल्याची टीका माजी मंत्री शिवाजी कर्डीले यांनी बाळासाहेब हराळ यांचे नाव न घेता केली.
नगर तालुक्यातील रुईछत्तीसी, मठपिंपरी, हातवळण, गुणवडी, वाटेफळ, कौडगाव , खांडका , मेहकरी येथील शेतकऱ्यांना खेळते भांडवलाचा चेक वाटप रुईछत्तीसी येथे वाटप करण्यात आला यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती राम साबळे हे होते.
यावेळी माजी जि. प. सदस्य हराळ यांनी केलेल्या बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या आरोपाला प्रतोत्तर देताना कर्डीले म्हणाले, गायीची धार मागून काढायची की पुढून काढायची हे ज्यांना माहित नाही त्यांनी टीका करू नये. टीका करण्यासाठी स्वतः तेवढे स्वच्छ असणं गरजेचे आहे.
जिल्हा परिषदेतील कामे ठराविक ठेकेदारांना देऊन आपली पोळी भाजून घेऊन ते काय भजन कीर्तन करतात का असा सवाल कर्डीले यांनी उपस्थित करत मी लोकात रात्रंदिवस राहात असून लोकांची ऊर्जा मलासतत मिळत असल्याने मला अजून कोरोना झालेला नाहीए असेही मिश्किलपणे नमूद केले.
कारखानदारांची बँक मोडून शेतकऱ्यांची बँक करण्याचे काम मी केले. कोरोना रोगामुळे शेतकरी, दुग्ध उत्पादक, छोटे मोठे व्यवसायीक अडचणीत आले या अडचणीच्या काळात जास्ती जास्त फायदा शेतकऱ्यांना व्हावा यासाठी प्रत्येक शाखे शाखेत जाऊन केंद्राच्या राज्याच्या योजना प्रत्यक्ष शेतकऱ्यां पर्यंत पोहचविण्यासाठी आमचा प्रयत्न चालू असल्याचे ते म्हणाले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved