टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कामगारांमध्ये संघटनेने घेतलेल्या पाठपुराव्याने समाधान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने एमआयडीसी येथील एक्साइड कंपनीशी करण्यात आलेल्या पाठपुराव्याला यश येऊन कर्मचार्‍यांना भरघोस बोनसचे वाटप करण्यात आले.

यावेळी कामगार संघटनेचे पदाधिकारी व कामगारांनी कंपनीच्या बाहेर आनंदोत्सव साजरा केला. टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कामगारांमध्ये बोनस मिळाल्याने समाधानाचे वातावरण आहे. स्वराज कामगार संघटनेचे अध्यक्ष पै. दत्ता तापकिरे यांनी वेळोवेळी एक्साइड कंपनीच्या व्यवस्थापनाशी चर्चा करुन पाठपुरावा केला.

तर कामगारांना भरघोस असा बोनस मिळवून दिल्याने कामगारांची दिवाळी गोड झाली आहे. बोनस मिळण्यासाठी शहराचे आमदार संग्राम जगताप, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल सर्व कर्मचार्‍यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष किरण दाभाडे, जनरल सेक्रेटरी पै.सुनील कदम,

खजिनदार दत्ता सोनवणे, कार्याध्यक्ष दीपक गांगर्डे, कामगार प्रतिनिधी बाबासाहेब गायकवाड, किसन तरटे, सुधाकर तामखडे, अशोक म्हस्के, दिनेश वाघ, सुनिल देवकुळे, गौतम भालेराव आदी उपस्थित होते. सर्व कर्मचार्‍यांच्या खात्यावर बोनस जमा झाल्यामुळे एक्साइड कंपनीच्या बाहेर फटाके वाजवून एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला.

टाळेबंदीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या कामगारांना भरीव बोनस मिळण्यासाठी संघटनेने सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून, कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे पै. दत्ता तापकिरे यांनी सांगितले. स्वराज्य कामगार संघटनेच्या वतीने एक्साइड कंपनी मधील सर्व कर्मचार्‍यांची दिवाळी गोड झाली असून सर्व कर्मचार्‍यांनी संघटनेच्या पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24