टेम्पो चालकावर सत्तुरने वार करून 1 लाख रुपये लुटले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 ऑक्टोबर 2020 :- टेम्पो चालकावर सत्तुराने वार करीत त्याच्याकडील 1 लाख 10 हजार रूपये लुटून नेले. नगर- औरंगाबाद रोडवरील खोसपुरी शिवारातील मिनाक्षी हॉटेल येथे पहाटे ही घटना घडली.

याप्रकरणी तीन अज्ञात चोरट्याविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालक महादेव तबाजी गिते (वय- 44 रा. मिरी ता. पाथर्डी) यांनी फिर्याद दिली आहे.

घटनास्थळी नगर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी भेट देऊन एमआयडीसी पोलिसांना तपासाबाबत सुचना केल्या आहेत. उपनिरीक्षक पवन सुपनर तपास करीत आहे.

फिर्यादी हे त्यांचा टेम्पो घेऊन खोसपुरी शिवारातील मिनाक्षी हॉटेलच्या पार्किंगमध्ये थांबले होते. पहाटेच्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी टेम्पोच्या दोन्ही काचा फोडून आत प्रवेश केला.

टेम्पोत झोपेत असलेल्या फिर्यादी यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. फिर्यादीची मान दाबून सत्तुराने वार केला. जखमी झालेल्या फिर्यादी यांच्या खिशातील 1 लाख 10 हजार रूपये काढून घेत चोरटे पसार झाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24