सत्यजित तांबे यांचे ‘ते’ आंदोलन म्हणजे दिशाभूल करण्याचा स्टंट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 ऑगस्ट 2020 :- महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आत्मनिर्भर भारत योजनेतील २० लाख कोटी रुपये कुठे गेले? यासाठी भाजप प्रदेश कार्यालयाचबाहेर येऊन आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले.

त्यांचा आंदोलनाचा प्रयत्न असफल झाला असला तरी हे आंदोलन म्हणजे अभ्यास न करता राज्यातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची टीका, भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकारणी सदस्य परिमल देशपांडे यांनी केली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातीन देशपांडे म्हणाले, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटलांनी आक्रमक भूमिका घेऊन युवक काँग्रेसला जशास तसे उत्तर दिले.

युवक काँग्रेसच्या बनावट बाईट कशा आहेत व जनता भाजपबरोबर आहे, हे आज दाखवून दिले. शासकीय योजना राबवल्या जाताना निधीचा विनियोग कसा होतो,

किंवा झाला आहे याची माहिती शासकीय कार्यालयात अथवा अगदी वेबसाईटवरती देखील मिळते. परंतु कोणत्याही स्वरूपाचा अभ्यास न करता केवळ स्टंट करण्याचा युवक काँग्रेसचा प्रयत्न आहे.

संगमनेरात रुग्ण वाढत आहेत. नगरपालिका एक रुग्णालय उभारू शकत नाही. रुग्णाची प्रचंड लूट चालू आहे. सत्तेत असणाऱ्या काँग्रेसने याकडे लक्ष दिले, तर जनतेचा दुवा मिळेल.

परंतु जनतेचे लक्ष वळवण्यासाठी युवक काँग्रेसचे स्टंट असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आहे. दूध उत्पादकांना भाव मिळत नाही, परीक्षा नसतानाही शुल्क आकारले जातात.

अव्वाच्या सव्वा वीज बिल येत आहे. अशी अवस्था असताना त्यावर युवक काँग्रेस आंदोलन का करत नाही. केंद्राने २० लाख कोटी रुपयांची तरतूद केली. त्याचा अभ्यास करून माहिती घ्या, अशी मागणी परिमल देशपांडे,

योगराज परदेशी, दिपेश ताटकर, रोहित चौधरी, राहुल भोईर, शैलेश फटांगरे, नवनाथ ववरे, विकास गुळवे, शुभम बेल्हेकर, चिराग साहू, सोमनाथ बोरसे आदींनी केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24