स्वातंत्र्य आणि समानता निर्माण करण्यास सावित्रीबाईंचेही योगदान

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- स्वातंत्र्य आणि समानता निर्माण करण्यास सावित्रीबाई फुलेंचेही योगदान आहे. महात्मा ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारधारेतून देशाला स्वातंत्र्य आणि आजचा आधुनिक समाज निर्माण झाला.

समाजात एकजूट आणि समानता कायम ठेवण्यासाठी फुले दांम्पत्यांची विचारधारा आणि चरित्र आजच्या नव्या पिढीला प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन प्रा. स्वाती सुडके-चौधरी यांनी केले. ओबीसी, व्ही.जे., एन.टी. जनमोर्चाच्या नगर शाखेच्यावतीने प्रख्यात व्याख्यात्या प्रा.सुडके यांचे व्याख्यान माळीवाडा महात्मा फुले पुतळ्या नजिक आयोजित केले होते.

त्यावेळी त्यांनी सावित्रीबाईंचे जीवनचरित्र उपस्थितांसमोर ठेवले. अध्यक्षस्थानी माजी महापौर भगवान फुलसौंदर होते. प्रा.सुडके पुढे म्हणाल्या, स्त्री-पुरुष समानता ही आजची गरज आहे. सावित्रीबाईंनी त्यांच्या काळात महात्मा फुले यांची चळवळ राबवून समाजाला नवी दिशा दिली होती.

फुले यांच्या निधनानंतरही सावित्रीबाईंनी ही विचारधारा त्यांच्या अखेरपर्यंत जपली आणि समाजाला दिशा देण्याचे काम केले. तो काळ अत्यंत वेगळ्या परंपरेतील होता. नवी परंपरा निर्माण करण्याचे जिकीरीचे काम सावित्रीबाईंनी केले. त्या समाजसुधारकच असं ही त्यांनी अनेक उदहारण देत स्पष्ट केले.

प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 190 व्या जयंतीनिमित्त सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात माजी महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले, ओबीसी चळवळीला फुले दाम्पत्यांच्या विचाराची खरी गरज असून, चळवळ संकुचित वृत्तीची न ठरता सत्याचा पुरस्कार करणारी ठरावी.

स्वागतपर भाषणात नगरसेवक बाळासाहब बोराटे म्हणाले, आज समाजात स्त्रीयांना जी समान संधी विविध क्षेत्रात प्राप्त आहे ती फुले यांच्या समाजसुधारणा कार्याची देणगी आहे. तर प्रास्तविकाात शहर काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब भुजबळ म्हणाले, प्रवाहा विरोधात लढणं आजच्या लोकशाहीतही अवघड आहे.

समाजावर वेगळ्या परंपरेचा पगडा असलेल्या 150 वर्षापूर्वीची स्थिती अत्यंत वेगळी होती पण आद्य समाजसुधारक महात्मा फुले यांनी समाजात समानता आणण्याचा जो प्रयत्न केला ती परंपरा सावित्रीबाईंनी जपली त्यामुळे स्वातंत्र्य देशाला मिळाले आणि स्वतंत्र्य भारताने समानताही स्विकारली, तो विचार पुरोगामी आहे.

ओबीसी नगर शाखेचे दत्ता जाधव, जयंत येलूलकर, प्रा.सुनिल जाधव, संतोष गेनाप्पा, विष्णूपंत म्हस्के, रमेश सानप, आनंद लहामगे, राजू पडोळे,

अनिल निकम, अनिल इवळे, विशाल वालकर, गौरव ढोणे, किरण बोरुडे, नईम शेख, सागर फुलसौंदर, मंगल भुजबळ, सौ.मनिषा गुरव, अमोल भांबरकर, जालिंदर बोरुडे, प्रकाश भंडारे, नागेश शिंदे, नितीन डागवाले, दिपक खेडकर आदि उपस्थित होते. शेवटी शशिकांत पवार-रावळ यांनी आभार मानले.

अहमदनगर लाईव्ह 24