अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- नगर येथील हॉटेल व्यावसायिकास आमिष दाखवून १४ लाख १७ हजार रुपयांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या नायजेरियन टोळीला सायबर पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे.
भारतातातील हर्बल प्रोडक्ट कंपनीकडून आमच्या कंपनीला हर्बल आईल खरेदी करावयाचे आहे. या व्यावसायात तुम्ही सहभागी झाले तर लाखो रुपये मिळतील असे आमिष दाखवून आरोपींनी केडगाव येथील ओंकार मधुकर भालेकर भालेकर यांना लाखो रुपयंचा गंडा घातला.
वेगवेगळी कारणे सांगून बँक खात्यावर पैसे मागवून घेतले. याप्रकरणी भालेकर यांच्या आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
सायबर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रतिक कोळी व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपींना पुणे येथून अटक करण्यात आली आहे. या आरोपींना न्यायालयाने ४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.