संगमनेर महाविद्यालयातील 201 विद्यार्थ्यांना 25 लाखांची शिष्यवृत्ती

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,30 सप्टेंबर 2020 :-सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना, आर्थिक दुर्बल घटक अर्थसहाय्य योजना, राजर्षी शाहु महाराज अर्थसहाय्य योजना व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवंत विद्यार्थी अर्थसहाय्य योजना या विविध योजनांच्या माध्यमातून विद्यापीठाशी संलग्नित पुणे-नगर-नाशिक जिल्ह्यातील कला,

वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विविध महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शिष्यवृत्ती मंजूर करत असते. शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत मेरिट शिष्यवृत्तींच्या माध्यमातून संगमनेर महाविद्यालयातील 201 विद्यार्थ्यांना जवळपास 25 लाख रुपये शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आलेली आहे.

शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बिहारीलाल डंग, कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, सर्व प्राध्यापक आदींनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी विद्यापीठाप्रती आभार व्यक्त केले. ते म्हणाले की,

विद्यापीठाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर मंजूर केलेली शिष्यवृत्ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान असून उच्चशिक्षणाची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी या शिष्यवृत्तीचे महत्त्व खूप मोलाचे आहे. शै.वर्ष 2020-21 पासून संगमनेर महाविद्यालयाच्या www.sangamnercollege.edu.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीबाबत स्वतंत्र ट्युब तयार केले असून,

त्यासोबत sangamner college Telegram Channel वर विविध शिष्यवृत्तींबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या संकेतस्थळाचे वेळोवेळी अवलोकन करावे,असे आवाहन प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24