जिल्ह्यात सोमवारी शाळांची घंटा वाजणार; शाळा प्रशासन झाले सज्ज…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :-  राज्यात कोरोनानंतर येत्या सोमवारपासून शाळा सुरू होणार असल्या तरी अद्यापही अनेक ठिकाणी पालकांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत अजूनही संभ्रम आहे.

तब्बल दीड वर्षांनंतर सोमवारी शाळेची घंटा एकदा वाजणार असून शाळेतील वर्गांमध्ये पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा किलबिलाट ऐकायला मिळणार आहे.

कोविडचा प्रभाव कमी झाल्याने शालेय शिक्षण विभागाने शहरी भागात आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग भरविण्यास मुभा दिली आहे.

त्यानूसार जिल्ह्यात ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतच्या 2 हजार 26 तर शहरी भागात आठवी ते बारावीच्या 96 आशा असून यात करोनाचा प्रतिबंध असणार्‍या भागातील शाळा वगळून उर्वरित ठिकाणी शंभर टक्के शाळा सुरू होण्याची आशा माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षण विभागाला आहे.

नियमांचे पालन अत्यंत महत्वाचे… शाळांमध्ये करोनाचे सर्व नियमांचे काटेकारे पालन करण्यात येणार असून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षीत अंतर, विद्यार्थ्यांचे तापमान मोजणे, एकाआड एक विद्यार्थी यांना बसविण्यात येणार आहे.

यासह शिक्षण विभागाच्या आदेशात शाळा सुरू झाल्यानंतर देखील पहिले दोन आठवडे अध्यापन न करता विद्यार्थ्यांना शाळेसाठी मानसिकपणे तयार करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.