अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- मागील अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भामुळे राज्यातील शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परंतु येत्या ४ ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा सुरु करण्यास मान्यता दिली आहे. कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु होणार आहेत.शिक्षण विभागाने मुख्यमंत्री कार्यालायला प्रस्ताव पाठवला होता.
हा प्रस्ताव मंजुर झाला आहे. मध्यंतरी ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्या होत्या. पण कोरोनाची दुसरी लाट आली आणि शाळा पुन्हा बंद झाल्या. विद्यार्थी मागच्या दीड वर्षांपासून ऑनलाइन शिक्षण घेत आहेत.१७ ऑगस्टला शाळा सुरु करण्याचा मानस होता. पण तो निर्णय रद्द झाला होता.
– शहरी भागात 8 वी ते बारावीचे वर्ग सुरू होणार तर ग्रामीण भागात 5 वी ते 12 वीच्या शाळा सुरू होणार
– प्रत्येक शाळेला आरोग्य केंद्राशी जोडण्याचा प्रयत्न
– विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एसओपी तयार करणार
– शाळांमध्ये कुठल्याही खेळांना परवानगी नाही.
– उपस्थिती सक्तीची नाही, पालकांची संमती आवश्यक
-स्थानिक प्रशासनाकडे सर्व अधिकार