अहमदनगर बातम्या

Ahmednagar News : पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध, फरार आरोपीचा तपास सुरू

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील पळून नेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात राहुरी पोलिसांना यश आले आहे. केवळ २४ तासांमध्ये सदर अल्पवयीन मुलीचा शोध पोलिसांनी घेतला असून या प्रकरणातील आरोपी फरार झाला आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरीतील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस कुणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला असून सदर गुन्हामध्ये अपहरणाचे कलम वाढविले आहे.

सदर गुन्हातील पिडीतचा व पिडीतेस पळवून नेणाऱ्या आरोपीचा तांत्रिक विश्लेषण आधारे शोध घेतला असता, सदर पिडितेस आरोपीने पुणे येथे पळून नेल्याचे निष्पन्न झाले. सदर मुलीस पुणे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून पालकांच्या ताब्यात देऊन नमूद आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, चंद्रकांत बोराटे, वाल्मीक पारधी, आजिनाथ पालवे, सुनील निकम, अंकुश भोसले, रोहिदास नवगिरे, सतीश कुराडे यांच्या पथकाने केली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या ऑपरेशन मुस्कान संकल्पनेतून व मार्गदर्शनातून तसेच अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनात

पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली लेखनिक हवालदार साळवे, कार्यालयीन लेखनिक पाखरे, अमोल गायकवाड, सम्राट गायकवाड, अशोक शिंदे, रोहकले, राहुल यादव, सुरज गायकवाड, नदीम शेख, प्रवीण बागुल यांनी तांत्रिक विश्लेषण आधारे केलेली आहे.

अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेणे तथा लैंगिक अत्याचार करणे, अशा गुन्ह्यात कुणाकडून अनवधानाने सहकार्य, मदत झाल्यास अथवा कुणास अशा प्रकारच्या गुन्ह्याबाबत माहिती असल्यास त्यांनी सदर माहिती पोलिसांना पुरवावी. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office