अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती.
या हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी बाळ बोठे हा गेल्या दीड महिन्यापासून पोलिसांना गुंगारा देत फरार आहे. बोठेला पकडण्यासाठी पोलिसांनी त्याला पारनेर न्यायालयात फरार घोषित करण्यासाठी
स्टॅंडिंग अर्ज सुद्धा दाखल केला होता आणि पारनेर न्यायालयातने ते अर्ज मंजूर करून पत्रकार बोठेला फरार घोषित सुद्धा केला आहे.पोलिसांनी रेखा जरे यांच्या हत्याकांडातील पाच आरोपींना अवघ्या तीन तीन दिवसात अटक करून या हत्याचा मुख्य सूत्रधार पत्रकार बोठे आहे अशी माहिती सार्वजनिक केली होती.
मात्र यानंतर मागच्या दीड महिन्यापासून पत्रकार बाळ बोठे हा फरार असल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान आज एका पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी म्हटले की पत्रकार बाळ बोठे याला लवकरच अटक करण्यात येईल.
या प्रकरणात आमच्यावर कोणताही दबाब नसून आम्ही या प्रकरणात निपक्षपणे तपास करत आहे. आणि आमच्याकडे पत्रकार बाळ बोठे विरुद्ध भक्कम पुरावे आहे यामुळे ते निश्चितपणे अटक होईल, असे स्पष्ट जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली आहे.