वाढती रूग्णसंख्या पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिले ‘हे’आदेश!

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रत्येक तालुकास्तरावर कोवीड केअर सेंटर कार्यान्वीत करण्यात यावेत. असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची कोरोना विषयक आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आली‌. त्यावेळी ते बोलत होते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जिल्हाधिकारी भोसले म्हणाले, जिल्ह्यातील कोवीड रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तेव्हा प्रशासनाने अधिक सतर्क राहून काम केले पाहिजे.

त्यासाठी दररोजच्या चाचण्यांची संख्या नेहमीपेक्षा अधिक वाढविली पाहिजे‌. दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या पण लसीकरण न केलेल्या लोकांची संख्या काही तालुक्यांमध्ये जास्त आहे. तेव्हा दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना प्रवृत्त करावे. अशा सूचना ही भोसले यांनी यावेळी दिल्या.