गस्तीवर असलेल्या पोलिसाला पाहताच डिझेल चोर माल सोडून पळाले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-कर्जत तालुक्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने हे रात्रीच्या वेळी गस्तीवर असताना ते कुळधरणमध्ये येताच डिझेल चोरांनी एक मोटारसायकल, डिझेलचे ड्रम व साहित्य रस्त्यावर टाकून पळ काढला. त्यामुळे डिझेल चोरीची घटना टळली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने हे गस्तीवर असताना पहाटे कुळधरणमधून जात होते.

त्यावेळी टेलिफोन टॉवरच्या बाजूला एक मोटारसायकल कर्जतच्या दिशेने येवून श्रीगोंद्याकडे जात असताना दिसली. त्यावेळी ही मोटारसायकल अचानक रस्त्याच्या बाजूला थांबली.

मोटारसायकलवरील दोघेजण ती गाडी, डिझेलने भरलेले ड्रम, डिझेल काढण्यासाठी वापरण्यात येणारा पाईप व एक मोठी सुरी त्याठिकाणी टाकून आयडिया टॉवरच्या दिशेने मोकळ्या शेतात पळाले.

ओढ्याच्या परिसरात चोरट्यांचा शोध घेतला. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी मोटारसायकल, सुमारे 120 लिटर डिझेल व साहित्य हस्तगत केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24