अहमदनगर: डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित भौतिकोपचार महाविद्यालय अंतर्गत “राज्यस्तरीय स्वर्गीय पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील” करंडकाचे दि. २१ ते २३ मार्च २०२४ दरम्यान विळद घाट, अहमदनगर येथे आयोजन करण्यात आले आहे.
या करंडकात क्रीडा, निबंध, पोस्टर, सांस्कृतिक स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेसाठी राज्यभरातून २०० पेक्षा जास्त स्पर्धक भाग घेणार आहेत. या स्पर्धेचा शुभारंभ दि. २१ मार्च २०२४ रोजी सकाळी मिनी मॅरेथॉनने होणार आहे.
करंडकाचा शुभारंभ संस्थेचे वैद्यकीय संचालक डॉ. अभिजीत दिवटे करणार असून याप्रसंगी प्राचार्य डॉ. श्याम गणविर, उपप्रचार्य डॉ. सुवर्णा गणविर व सर्व प्राध्यापक उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सदरील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या असून डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांना चालना देणारे असे विविध उपक्रम हे सातत्याने राबविले जात असतात.
अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना मिळते आणि शिक्षणाचा दर्जा देखील सुधारतो असे मत मांडून खासदार विखेंनी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.