घरकुल वंचितांना आत्मनिर्भर आवास भूमीगुंठेशिवाय पर्याय नाही -अ‍ॅड. गवळी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने घरकुल वंचितांना हक्काची घरे मिळण्यासाठी आत्मनिर्भर आवास भूमीगुंठाच्या माध्यमातून शहरालगत घरासाठी जागा उपलब्ध करुन दिली जात आहे.

या पार्श्‍वभूमीवर रविवार दि.13 डिसेंबर रोजी हुतात्मा स्मारक येथे घरकुल वंचित सत्यबोधी सुर्यनामा केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. कोणत्याही पक्षाचे सरकार सत्तेवर आलेतरी देशातील सर्व घरकुल वंचितांना फुकट रेशनकार्डवर घरे मिळणे अशक्य गोष्ट आहे.

केंद्र व राज्य सरकारकडे घरकुल वंचितांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी एवढा मोठा निधी व सरकारी जागा देखील उपलब्ध नसल्याची जाणीव प्रत्येक घरकुल वंचितांना होणे गरजेची आहे. यासाठी संघटनेने लॅण्ड पुलिंगच्या माध्यमातून शहरालगत खडकाळ पड जागेवर आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून इसळक-निंबळक येथे घरकुल वंचितांना 80 हजार रुपयात एक गुंठा जागा देण्याचे कार्य सुरु आहे.

घरकुल वंचितांनी घर मिळण्यासाठी प्रयत्न करुन अल्प किंमतीत घरासाठी मिळणारी जागा घेणे आवश्यक आहे. घरकुल वंचितांना आत्मनिर्भर आवास भूमीगुंठ्याशिवाय पर्याय नाही. स्वस्तात जागा मिळत असल्याने जागेचा प्रश्‍न सुटल्यास घर होण्याची खात्री निर्माण झाली आहे. तर ही घरे कायदेशीर मार्गाने घरकुल वंचितांना मिळणार असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे.

इसळक-निंबळक येथे आत्मनिर्भर आवास भूमीगुंठा योजनेद्वारे घरकुल वंचितांना घरे दिली जात असताना स्वत:च्या मालकीची घरे नसणारे पोलीस व पत्रकारांना देखील जागा देण्याचे ठरविण्यात आले आहे. दोघा व्यक्तींना एक प्लॉट (एक गुंठा) मध्ये निम्मी-निम्मी जागा देखील घेता येऊ शकणार आहे.

ट्वीन बंगलोसाठी व एकत्रित रो हाऊसिंग कॉलनीसाठी सलग जागा देखाल उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24